कुपवाड (सांगली) | दि. १ जानेवारी
जैन धर्मातील संन्यास दीक्षेच्या पवित्र परंपरेला उजाळा देणारा भव्य जैनेश्वरी दीक्षा महोत्सव कुपवाड येथे आयोजित करण्यात आला आहे. आचार्यश्री १०८ सन्मतीसागरजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री १०८ विदेहसागरजी महाराज यांच्या पावन हस्ते सोमवार ( दि. ५ जानेवारी) रोजी दुपारी ठीक १.०० वाजता मुख्य दीक्षा विधी संपन्न होणार आहे.
हा दोन दिवसीय महोत्सव रविवार (दि. ४) पासून सुरू होत असून, राज्यभरातून हजारो जैन श्रद्धाळुंची ची उपस्थिती अपेक्षित आहे. रथोत्सव, हळदी-मेहंदी, गोदभराई, अभिषेक-शांतिधारा, गणधरवलय विधान आणि विशेष प्रवचन अशा विविध धार्मिक विधींनी हा उत्सव वैराग्याची अनोखी उत्सवमूर्ती साकारणार आहे.
रविवारी सकाळपासूनच मंगलनिनादाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. पहाटे ५.०० वाजता मंगलनिनाद, ६.०० वाजता सा.भक्ती, ७.०० वाजता अभिषेक-शांतिधारा, ९.१५ वाजता आहारचर्या, ११.३० वाजता सामाईक आणि दुपारी १.०० वाजता गणधरवलय विधान होईल. दुपारी ३.०० वाजता विशेष प्रवचन व सवाल-जवाब सत्र, ४.०० वाजता गोदभराई, संध्याकाळी ६.०० वाजता दीक्षार्थींची भव्य रथोत्सव मिरवणूक, ७.३० वाजता मेहंदी उत्तराई आणि रात्री ८.०० वाजता संगीत आरतीने दिवसाची सांगता होईल. सोमवारी दीक्षा दिवसाची सुरुवातही पहाटे ५.०० वाजता मंगलनिनादाने होईल. ६.०० वाजता सा.भक्ती, ७.०० वाजता अभिषेक-शांतिधारा, ९.०० वाजता आहारचर्या, ११.०० वाजता हळदी महोत्सव, ११.३० वाजता सामाईक आणि दुपारी १.०० वाजता मुख्य भव्य दीक्षा महोत्सवाला प्रारंभ होईल. कार्यक्रमाचे मुख्य स्थळ श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिर (मोठी बस्ती) हॉल, कुपवाड असून, श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिर (लाल बस्ती) आणि श्री १००८ प्राचीन आदिनाथ दिगंबर जिन मंदिर येथेही सहाय्यक व्यवस्था आहे. या महोत्सवाचे आयोजन दिगंबर जैन सेवा समिती, वीर सेवा दल, सुधर्मसागर मुनीमहाराज प्रतिष्ठान आणि वीर महिला मंडळ, कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. सर्व जैन श्रद्धालूंनी या पवित्र वैराग्य प्रसंगाला उपस्थित राहून दीक्षार्थींच्या वैराग्यभावनेला अनुमोदना द्यावी, असे आयोजकांचे आवाहन आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: ९७६४० ०१००८, ९७३०७०४१०५, ८१४९२ ३५९०३, ८६६९५ ५८१०८.

