मोडनिंब :
जैन धर्मातील भक्ती, अध्यात्म आणि चमत्कारांचे केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील प्रथम चतुर्मुख शनिग्रह अरिष्ट निवारक भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर, अतिशय क्षेत्र मोडनिंब येथे रविवारी ( ता. ११ ) एक भव्य आणि पावन कार्यक्रम पार पडला. संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या आशिर्वादाने मुनिपुंगव १०८ सुधासागरजी महाराज रचित पं. सुधीरजी शास्त्री यांच्या हस्ते १०८ रिद्धी-सिद्धी मंत्राद्वारे विशेष पूजन, अभिषेक आणि महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला.
या पावन प्रसंगाचे विधानकर्ते आणि अल्पोपहार दातार म्हणून शैलेश भारत दोशी, शितल भारत दोशी व संपूर्ण दोशी परिवार यांनी भव्य योगदान दिले. तसेच १००८ पद्मप्रभु दिगंबर जैन चॅरीटेबल संस्था, मोडनिंब च्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीपणे साकारला गेला.
संस्थेचे प्रमुख पदाधिकारी अध्यक्ष विशाल मेहता, उपाध्यक्ष अरविंदजी गुरसाळकर, संजय मेथा, पोपटलाल दोभाडा, राहुल गांधी, सुरेश गांधी, सुनिल पुरवत या ऐतिहासिक आणि चमत्कारी कार्यक्रमात सुहास दोशी, सुदर्शन मेहता, पंडित अभिनंदन खडके, तसेच कळस्कर परिवार, मेहता परिवार, दोशी परिवार, बाबळे परिवार आणि सकल जैन समाज मोडनिंब यांच्या उपस्थितीने वातावरण भक्तिमय आणि ऊर्जावान झाले होते. भाविकांनी या पावन क्षणाचे साक्षीदार होऊन पुण्यसंचय केला. शनिग्रह अरिष्ट निवारणासाठी प्रसिद्ध असलेल्या या अतिशय क्षेत्रात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी हा विशेष अभिषेक आणि पूजन होत असते.

