बारामतीत अँजिओग्राफी फक्त ३०००,मोतीबिंदू ऑपरेशन २२०० रुपयांत;

बारामती:
बारामती आणि परिसरातील हृदयरोग व नेत्ररोग ग्रस्तांसाठी खूप मोठी दिलासादायक बातमी! श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, बारामती आणि आनंदकृपाजी हॉस्पिटल अँड सर्जरी सेंटर, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग व नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या रविवार (दि. १८ जानेवारी ) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री महावीर भवन, तिरंगा चौक, कॅनाल रोड, बारामती येथे होणार आहे.

या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, साखर तपासणी, नेत्र तपासणी आणि आवश्यक मार्गदर्शन पूर्णपणे मोफत केले जाणार आहे. विशेष म्हणजे, गरज पडल्यास पुढील उपचारांसाठी खूपच कमी दरात सवलत उपलब्ध होणार आहे. अँजिओग्राफी – केवळ ३,००० रुपये, मोतीबिंदू शस्त्रक्रिया – फक्त २,२०० रुपये. सर्व तपासण्या आणि प्राथमिक उपचार निःशुल्क असून, हृदय शस्त्रक्रियेसाठी फक्त प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी रुग्णाचे सर्व जुने वैद्यकीय रिपोर्ट्स सोबत आणणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या सूचना..
येताना आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा इन्शुरन्सची छायाप्रती, चालू औषधांची यादी आणि जुने डॉक्टर रिपोर्ट्स नक्की आणावेत. फोनवर नोंदणी होणार नाही, प्रत्यक्ष शिबिरस्थळी येऊन नोंदणी करावी. मानवता हीच खरी ईश्वरसेवा या भावनेने आयोजित या उपक्रमाचा बारामती व परिसरातील हजारो नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.