२५०० कोटींच्या साम्राज्याचे रहस्य
उलगडणार डायरेक्टर्स विशाल आणि विश्वा चोरडिया
बारामती दि.20
बारामतीकरांनो, तुमच्या शहरात येणार आहे यशस्वी उद्योजकतेची प्रेरणादायी कथा ऐकण्याची सोनेरी संधी! एक छोटी पारंपरिक मसाला कंपनी ते ५०+ देशांमध्ये पोहोचलेला जागतिक ब्रँड आणि २५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सुहाना मसाले या यशस्वी ब्रँडमागील संघर्ष, अडचणी, निर्णय आणि यशाची खरी कहाणी आता थेट बारामतीत ऐकायला मिळणार आहे.
सुहाना मसाल्याचे डायरेक्टर्स विशाल चोरडिया आणि विश्वा चोरडिया स्वतः या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या व्यावसायिक प्रवासातील प्रत्येक टप्पा मांडणार आहेत. पारंपरिक कुटुंबीय व्यवसायापासून सुरू झालेल्या या सफरीत कसे नवीन बाजारपेठा जिंकल्या, ब्रँडिंग कसे केले, अडथळे कसे पार केले आणि आज ‘हर घर सुहाना’ हे स्वप्न साकार कसे केले, याची सविस्तर माहिती मिळणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थी, नवउद्योजक, व्यावसायिक आणि सर्व बारामतीकरांसाठी पूर्णपणे खुला आहे. फक्त यशाच्या कथा ऐकण्यासाठी नाही, तर स्वतःची यशोगाथा घडवण्यासाठी प्रेरणा घेण्याची ही उत्तम संधी आहे.
सीट कन्फर्म करण्यासाठी त्वरित रजिस्ट्रेशन करा:
🔗 https://forms.gle/g8gW8YWHcsbVwfqf9
कार्यक्रम तपशील:
दिनांक: २२ जानेवारी २०२६ (गुरुवार)
वेळ: संध्याकाळी ५:३० वाजता
स्थळ: गदिमा सभागृह, बारामती

