रोहित उपाध्ये यांचे आकस्मिक निधन;

कुटुंब आणि समाजावर शोककळा

अकलूज, दि. २०
अकलूज येथील जैन समाजातील रोहित भारत उपाध्ये यांचे सोमवारी सायंकाळी अचानक निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने उपाध्ये कुटुंबीयांसह परिसरातील धार्मिक आणि सामाजिक वर्तुळामध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
धार्मिक परंपरांशी निष्ठावान, सुसंस्कृत आणि समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने अनेकांच्या मनात शोक आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आणि वैयक्तिक स्तरावर त्यांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.