यांचा सन्मती सेवा दला कडून सत्कार;
नवी मुंबई, दि. २५
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांचा वाढदिवसानिमित्त श्री सन्मती सेवा दल संस्थेच्या वतीने त्यांच्या कार्यालयात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. श्री सन्मती सेवा दलाचे मार्गदर्शक असलेल्या पाटील सरांच्या या सत्कार समारंभात संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले.
यावेळी श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक-अध्यक्ष मिहीर गांधी, सदाशिवनगर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विरकुमार दोशी, अध्यक्ष नमन गांधी यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी पाटील यांना रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी अकलूज येथे आयोजित होणाऱ्या श्री सन्मती सेवा दलाच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळावा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सुपूर्द करण्यात आली. याशिवाय णमोकार तीर्थ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सव आणि टेंभुर्णी येथे ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या मानस्तंभ महामस्तकाभिषेक कार्यक्रमाच्या माहितीपत्रिकाही त्यांना देण्यात आल्या.
भेटीदरम्यान सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली. पाटील सरांनी सन्मती सेवा दलाच्या विविध समाजोपयोगी आणि मानवतावादी उपक्रमांचे कौतुक करत आयोजकांना पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

