हडपसरमध्ये जैन समाजासाठी ऐतिहासिक आयोजन;

२५ फेब्रुवारी ते ४ मार्च सिद्धचक्र महामंडल विधान

पुणे, दि. २३

हडपसर येथील श्री १००८ पद्मप्रभ दिगंबर जैन मंदिर व सहस्रकुट जिनालय येथे २५ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत सिद्धचक्र महामंडल विधान हा आठ दिवस चालणारा भव्य धार्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या विधानामुळे हजारो श्रावक-श्राविकांना एकत्र येऊन सिद्धचक्राच्या पूजनाने पुण्यार्जन करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या आठ दिवसांच्या महामंडल विधानात दररोज वेगवेगळ्या धार्मिक भूमिकांसाठी विशेष बोली आणि दानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सौधर्म इंद्र, ईशान्य इंद्र, कुबेर इंद्र, यज्ञनायक, मंगल कलश स्थापक, ध्वजारोहण कर्ता, दीप प्रज्वलन कर्ता, मंडप दातार, प्रत्येक दिवसाचा अन्नदाता तसेच नारळ पूजेसाठी विशेष दान अशा विविध सेवांचा समावेश आहे.
विशेष वैशिष्ट्ये

  • बोली किंवा दान करणाऱ्या श्रावकांचे छायाचित्र विशेष पत्रिकेत प्रकाशित होणार
  • इंद्र आदी बोलीधारकांना मंडळाकडून अष्टद्रव्य, धोती-दुपट्टा, किरीट व माळ प्रदान
  • सर्व नोंदणीकृत श्रावकांना किरीट व माळ देण्याची व्यवस्था
  • नारळ अर्पणासाठी सोवळे परिधान अनिवार्य; पूर्वनोंदणी आवश्य

इच्छुक श्रावक-श्राविकांनी आपली नावे पूर्वनोंदणीसाठी लवकरात लवकर जमा करावीत. तसेच बोलीधारकांनी आपली नावे व छायाचित्रे शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ पर्यंत मंडळाकडे सादर करावीत, जेणेकरून पत्रिकेची छपाई वेळेत होईल.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क
प्रकाश बुद्रुक – ९८६०४४६८५४
सुशांत मूळे – ९८२२७२२३५८