श्री आदिनाथ जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव

२८ जानेवारी पासून; मुनिश्री सुमनसागरजी-प्रणतसागरजींच्या सान्निध्यात भव्य विधींची मेजवानी

शिरजगाव दि. २४

अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात नव्याने उभारलेल्या मानस्तंभाच्या निमित्ताने श्री मंजिनेंद्र आदिनाथ जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. हा पाच दिवसांचा धार्मिक महोत्सव बुधवार, २८ जानेवारी २०२६ ते रविवार, १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटणार असून, परिसरात आधीपासूनच भक्तिमय वातावरण दाटले आहे.

या पंचकल्याणक सोहळ्याला परमपूज्य आचार्य श्री १०८ विशुद्धसागरजी महाराज यांचे प्रिय शिष्य श्रमण मुनिश्री १०८ सुमनसागरजी महाराज, श्रमण मुनिश्री १०८ प्रणतसागरजी महाराज तसेच क्षुल्लक श्री १०८ विशदसागरजी महाराज यांचे पावन सान्निध्य लाभणार आहे. या सान्निध्यामुळे हजारो श्रावक-श्राविका आणि धर्मप्रेमी भाविक या महोत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम
घटयात्रा, देवाज्ञा, गुरुआज्ञा, ध्वजारोहण, मंडप उद्घाटन इंद्र प्रतिष्ठा, सकलीकरण, यागमंडल विधान विविध कल्याणक पूजन, पंचामृत अभिषेक, जन्माभिषेक केवलज्ञान अंतरिक क्रिया, समवसरण व दिग्दर्शन, निर्वाण कल्याणक पूजन शोभायात्रा, दररोज प्रवचन, महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम या प्रतिष्ठा महोत्सवासाठी प्रतिष्ठाचार्य म्हणून पं. भरतभूषणजी शास्त्री (इंदूर) आणि पं. अखिलेशजी शास्त्री (संग्राम) हे कार्य पाहणार आहेत. संपूर्ण आयोजन श्री सम्राट दिगंबर जैन समाज, शिरजगाव कसबा यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांसाठी निवास, भोजन आणि इतर सोयींची उत्तम व्यवस्था केली आहे. “या पवित्र पंचकल्याणक महोत्सवात सहभागी होऊन भगवान आदिनाथांच्या चरणी श्रद्धांजली वाहण्याची आणि धर्मलाभ घेण्याची संधी चुकवू नका,” असे आवाहन आयोजकांनी सर्व जैन बांधव-बहिणींना केले आहे.


शिरजगाव येथील हा महोत्सव जैन समाजासाठी एक विशेष आध्यात्मिक घटना ठरणार असून, मानस्तंभ आणि जिनबिंब प्रतिष्ठेमुळे मंदिराचे वैभव अधिक वाढणार आहे.