संजय धन्यकुमार फडे यांनी नियमपूर्वक सल्लेखना स्वीकारून केले देहत्याग;

अकलूज, २४ जानेवारी २०२६ : अकलूज येथील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर संजय धन्यकुमार फडे यांनी शुक्रवार, २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.२० वाजता नियमपूर्वक सल्लेखना स्वीकारून शांतपणे देहत्याग केला.

फडे हे मनमिळावू स्वभावाचे, शिस्तप्रिय आणि सामाजिक जाणिवांचे असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि समाजातील सक्रिय सहभाग यामुळे ते अनेकांच्या प्रेरणास्थान होते. सल्लेखना स्वीकारून त्यांनी जैन परंपरेतील तप, संयम आणि आत्मशुद्धीचा आदर्श घालून दिला आहे.


त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता अंत्ययात्रा इंदापूर रोडवरील त्यांच्या राहत्या घरापासून निघाली. फडे यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे, आप्तेष्ट आणि मोठा परिचित परिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, धार्मिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आणि वैयक्तिक स्तरावर त्यांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केल्या आहेत.