उद्या चैतन्य लॉन्च येथे आहारचर्या!
परम पूज्य आचार्य श्री गुणभद्रनंदी जी महाराज ससंघ यांचा पवित्र विहार णमोकार तीर्थ (नाशिक जिल्ह्यातील मलासाने येथे नव्याने विकसित होत असलेले भव्य जैन तीर्थक्षेत्र) कडे सुरू आहे. या विहार यात्रेच्या अंतर्गत आज गुरुवार, (दि. १ ) रोजी भिगवण ते डीकसळ असा पायी विहार संपन्न होत आहे. उद्या शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी चैतन्य लॉन्स येथे ससंघाची आहारचर्या होणार आहे. भिगवण, डीकसळ आणि चैतन्य लॉन्स परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून आचार्यश्रींच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ घेत आहेत.

