गजपंता सिद्ध क्षेत्रात आज विश्राम,
गजपंता दि. २४
श्री क्षेत्र णमोकार तीर्थाच्या दिशेने आचार्य श्री गुणभद्र नंदीजी महाराज गुरुदेव ससंघ यांचा मंगल विहार भक्तिभावाने आणि आनंदाने सुरू झाला आहे. गणाधिपती गणधराचार्य कुंथुसागर महाराजांचे प्रिय शिष्य तसेच परमपूज्य समाधिस्थ गुरुदेव गुणनंदीजी महाराजांचे पट्टशिष्य असलेले प्रशांतमूर्ती आचार्य श्री गुणभद्र नंदीजी महाराज सध्या या पावन यात्रेत आहेत.
शनिवार,( दि. २४) रोजी आचार्यश्रींचा आजचा विश्राम सिद्ध क्षेत्र गजपंता येथे आहे. उद्याची (रविवार) आहारचर्या देखील याच सिद्ध क्षेत्रात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विहारामुळे गजपंता परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, श्रावक-श्राविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन, सेवा, पादवंदन आणि जलकुंभ अर्पण करत गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. आचार्यश्रींच्या या मंगल विहार यात्रेमुळे श्री क्षेत्र णमोकार तीर्थाचे आध्यात्मिक महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होत असून, जैन समाजातील भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि श्रद्धा दिसून येत आहे. या यात्रेत सहभागी होऊन गुरुदेवांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी अनेक श्रद्धालू परिसरात दाखल होत आहेत.

