राहुल वाघोलीकर यांची स्वीकृत नगरसेवक पदावर निवड;

बारामती:
बारामती नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत राहुल वाघोलीकर यांची अधिकृत निवड झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाने आज ही निवड जाहीर केली असून, राजकीय व सामाजिक वर्तुळात त्यांचे जोरदार अभिनंदन होत आहे.
सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा आणि नगरविकासाच्या क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या राहुल वाघोलीकर यांची ही निवड बारामतीच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. समर्थकांच्या मते, त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल आणि स्थानिक पातळीवर विकासाच्या कामांना चालना मिळेल.
या निवडीबद्दल सर्वच स्तरातून राहुल वाघोलीकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.