अकलूज:
जैन समाजातील इच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांसाठी मोठी बातमी! श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या वतीने नववा राज्यस्तरीय जैन वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार ( दि. २५ जानेवारी ) रोजी अकलूज येथे आयोजित होत आहे. या मेळाव्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ३४० मुलांचे आणि २५७ मुलींचे (एकूण ५९७ हून अधिक) फॉर्म यशस्वीरित्या नोंदणीकृत झाले आहेत. ही संख्या पाहता मेळावा ‘हाऊसफुल’ होण्याची शक्यता आहे!
या मेळाव्यातून जैन समाजातील योग्य जोडीदार शोधण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. आयोजकांकडून विशेषतः राज्यभरातील जैन पालक व इच्छुक युवक-युवतींना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी शुल्क प्रत्येकी २,००० रुपये ठेवण्यात आले असून, आवश्यक फॉर्म आणि अधिक माहिती लगेच उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यांना योग्य जीवनसाथी हवा आहे, त्यांच्यासाठी हा मेळावा खूपच फायदेशीर ठरू शकतो. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी त्वरित संपर्क साधा: ९२७०६०६२६९

