जालना शहरात आचार्य आर्यनंदी महाराजांच्या रजत समाधी महामहोत्सव;

भव्य रथयात्रा, अभिषेक व महाप्रसादासह धार्मिक उत्सव

जालना (जैन टुडे प्रतिनिधी):

तीर्थशिरोमणी आचार्य श्री १०८ आर्यनंदी जी महाराज यांच्या रजत समाधी निमित्त जालना शहरात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महामहोत्सवाचे आयोजन सकल जैन समाज, जालना यांच्या वतीने करण्यात येत असून, आचार्य श्री १०८ पवित्रसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच चर्या शिरोमणी आचार्य श्री १०८ प्रशांत सागरजी महाराज यांच्या सान्निध्यात हा उत्सव साजरा होणार आहे.

जैन समाजासाठी हा ऐतिहासिक आणि पवित्र सोहळा ठरणार असून, शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
या महामहोत्सवाचा मंगल प्रवेश शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता होणार असून, संगम कीर्ती स्तंभ, सिद्धीलाल क्लॉथ बिझनेस सेंटर, आझाद मैदान चौक, मंठा रोड, जालना येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता श्री १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, कावडाबाद, जालना येथे अभिषेक पूजन व महाराजश्रींचे आशीर्वचन होणार आहे.


याच अनुषंगाने रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, ही रथयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होणार आहे. रथयात्रेनंतर अर्पण भवन, नेहरू रोड, सराफा बाजार, जालना येथे महाराजश्रींचे पूजन, आशीर्वचन व सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. “या पवित्र व ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यास जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,” असे आवाहन आयोजक सकल जैन समाज, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा महामहोत्सव जैन संस्कृतीच्या संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार असून, भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याची संधी आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा.